एक लोकशाहीतील मूळ संकल्पना आणि तत्त्वे १ . लोकशाही म्हणजे काय ? आपण समाजात राहतो . आयुष्यभर समाजातील वेगवेगळ्या घटक संसथाचे सदस्य म्हणून वावरतो . आपले कुटुंब , आपला शेजार , एखादे मंडळ , कार्यालयीन संघटना , जाती , प्रांत , राष्ट्र इत्यादी संस्थाचे आपण सभासद असतो आणि संस्थेसाठी म्हणून कित्येक निर्णय घेतो - निदान मत मांडतो . संस्थेशी ऋणानुबंध ठेवतो . संस्थेचे ध्येय काय आहे , कोणत्या नियमांतर्गत ते गाठायचे आहे , कुणावर जबाबदारी टाकायची आहे , फायदे मिळवायचे आहेत ते कुणासाठी अशासारख्या सामूहिक निर्णयांचे स्वरुप आणि आपण आपल्या वैयक्तिक प्रश्नांसाठी वैयक्तिक जबाबदारी घेतलेल्या निर्णयांचे स्वरुप वेगळे असते . सामूहिक निर्णय जास्तीत जास्त योग्य आणि न्यायोचित असणे हे लोकशाहीचे खरे मर्म आहे , यासाठी निर्णय प्रक्रियेत भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा आणि तो त्यांना योग्य त - हेने बजावता यावा हे आदेश लोकशाही व्यवस्थेचे लक्षण मानले जाते . सामूहिक निर्णय प्रक्रियेवर लोकमताचे नियंत्रण आणि सर्वांना समान हक्क हे लोकशाहीचे दोन निकष ठरतात . कोणत्याही लहान मोठया संस्थेत हे दोन निकष पाळले जात...