तीन पारदर्शी , उत्तरदायी सरकार 36. लोकशाहीसाठी पारदर्शी सरकार महत्वाचे का ? लोकशाही पारदर्शी शासन ही मूलभूत गरज आहे . सरकार दरबारातील माहिती अचूकपणे आणि वेळच्या वेळी लोकांपर्यंत पोचत राहिली तरच कार्यकारी मंडळाच्या योग्य अयोग्य निर्णयांची , तसेच , कारवाईची जबाबदारी निश्चित ठरवता येते , त्यावरुनच आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने चांगले काम केले किंवा नाही . हे लोक ठरवू शकतात . सरकार चालवण्याचा खर्च जनताच करत असल्याने , आपल्या पैशांचा विनियोग कसा केला जातो ही माहिती लोकांना मिळणे किंवा त्यांच्या वतीने वृत्तपत्रांनी मिळवणे हा जनतेचा मूलभूत हक्क आहे . पुष्कळदा अशी माहिती मेहेरबानी म्हणून दिली जाते किंवा खर्चिक आणि वेळखाऊ मागणी आहे अशी टीका करुन टाळाटाळ केली जाते . पण आपण हे विसरतो की सरकारी माहिती जाहीर होण्याने उलट सरकारची कार्यक्षमता वाढण्यास मदतच होते . कारण कुठे फालतू खर्च झाला , कुठले धोरण चुकले , कुठे भ्रष्टाचाराला वाव मिळाला इत्यादी बाबींवर लोकांना नेमके बोट ठेवता येते आणि पढे त्याच त्या होणा - या चुका टाळता येतात . नागरी स्वातंत्र्य जपण्यासाठी सुद्धा शासकीय माहिती लोकापर...